समाज सहविचार सभा ०२
वेळ सायंकाळी ६ वा.
ठिकाण बापू चव्हाण यांचे घर
वेळ सायंकाळी ६ वा.
ठिकाण बापू चव्हाण यांचे घर
अहवाल
आज दि.२६/११/२०१७ रोजी बापू चव्हाण यांच्या घरी नाशिक जिल्ह्यात कार्यरत नंदुरबार धुळे जिल्ह्यातील टोकरेकोळी समाजातील व्यावसायिक व नोकरदार बांधवांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली.सभेत समाज बांधवांना एकत्रित करण्याच्या दृष्टीने गेट टुगेदरचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली
गेट टुगेदर साठी विविध ठिकाणावर विचार विनिमय करण्यात आला.समाज बांधवांनी ४ ते ५ हॉल ची नावे सुचवली त्यापैकी आपल्याला सर्वांना परवडेल असे ठिकाण निवड करण्याबाबत सर्व संमती देण्यात आली.गेट टुगेदर साठी जेवणाची व्यवस्था करतांना जेवणाचे मेनू २ भाज्या,पुरी,सलाड,एक स्वीट दिश घेण्यात यावी असे ठरवले गेले.कार्यक्रमासाठी प्रतिकुटुंब १०००/- रु देण्यात यावे पण काही कारणास्तव कुणाला १०००/- रु देणे शक्य नसल्यास ५०० रु.दिले तरी चालतील याबबत सर्व संमतीने मान्यता देण्यात आली.
उपस्थित सर्व समाजबांधवांच्या सर्व संमतीने दि.१७/१२/२०१७ रोजी गेट टुगेदर करण्याबाबत नियोजन करण्यात आले.कार्यक्रम दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत वेळ ठरवण्यात आली. कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबाने आपला परिचय करून देण्यासाठी स्टेजवर येऊन आपल्या कुटुंबाचा परिचय करून द्यावा.तसेच कोणाला काही activity सदर करायच्या असतील तर त्यांनाही वेळ देण्यात यावा.याबबत सर्व संमतीने मान्यता देण्यात आली.
समाज बांधवांना एका संघटीत करण्यासाठी whatsapp गृप तयार करण्यात आला आहे मात्र काही बांधव त्यावर अन्य मेसेज टाकतात .गृपवर फक्त समाजहिताचे पोस्ट यावेत.समाजातील काही बांधवांच्या प्रगती पुरस्कारबाबतीत बातमी असल्यास त्या पोस्ट टाकण्यात याव्यात.याबबत सर्व संमतीने मान्यता देण्यात आली.
गेट टुगेदर साठी नियोजन करण्यासाठीची जबाबदारी श्री.सुदाम चव्हाण,संजय शिंदे,निलेश कोळी,देविदास नवसारे,गुलाबराव मगरे,बापू चव्हाण ,शेखर शिरसाठ ,विजय कोळी,महेद्र चव्हाण यांचावर सोपवण्यात आली.
चहापान नंतर सभेची सांगता झाली.

No comments:
Post a Comment