Tuesday, 8 January 2019

गेट टूगेदर सहविचार सभा इतिवृत्त

*खांदेश आदिवासी टोकरे कोळी /कोळी महादेव समाज परिचय व गुणगौरव सोहळा नियोजन सभा इतिवृत्त*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*आज दिनांक०६/०१/२०१९ रोजी किशोर शिरसाठ यांच्या घरी सहविचार सभा उत्साहात पार पडली.*
*नियोनासाठी पुरुष सदस्यांसह महिला सदस्या उपस्थित होते.*

*श्री सुदाम चव्हाण सरांनी नियोजनाच्या पूर्वतयारीचा विषय मांडला त्यात सर्वांनी सहभाग घेत आपापले मत मांडले.*

*ठळक मुद्दे*

*१] १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थींचा गुणगौरवसाठी प्रमाणपत्र भारत वेंदे साहेबांकडे २ दिवसात सर्वांनी द्यावेत.त्यांचे नियोजन वेंदे साहेबांनी करावे त्यांना प्रकाश चव्हाण सर सोबत असतील त्यांनी उपलब्ध रिक्वेस्ट नुसार ट्रॉफीचे नियोजन करावे अशी जबाबदारी देण्यात आली.*

*२]कार्याक्रमासाठीचे फ्लेक्स बोर्ड छपाई करणे,परिवार परिचय फॉर्म छपाई करणे,पारितोषिक वितरण प्रमाणपत्र छापणे हि जबाबदारी दिलीप चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली.*

*३]कार्यक्रमासाठी महर्षी वाल्मिकी फोटो सुदाम चव्हाण सरांनी आणावा.*

*४] ज्ञानेश्वर कोळी यांनी पुष्पगुच्छ,हार पूजासाहित्य उपलब्ध करावेत त्यांना बापू चव्हाण सहकार्य करतील.*

*५]गेट टू गेदर कार्यक्रमात सर्वांना सहभाग घेता येतील या सारखे खेळ घेण्यात येणार आहेत त्यांचे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात आले.*

 *a] KBC सारखा कोण होईल वाल्मिकीचार्य खेळ श्री प्रकाश चव्हाण सर घेतील.*

*b]महिला वर्गाचा रांगोळी स्पर्धा,चमचा लिंबू,संगीत खुर्ची ,होम मिनिस्टर सारखे खेळ वैशाली शिरसाठ,मनीषा शिंदे,संगीता चव्हाण,प्रमिला चव्हाण ,रुपाली चव्हाण..... घेतील.*

*c] महिलांचा हळदी कुंकुचा कार्यक्रम नियोजित स्थळी पार पडण्याची जबाबदारी महिला वर्गाने वाटून घ्यावा.*

*d] दि १३/०१/२०१९ रोजी संजय शिंदे सरांच्या घरी महिला वर्गाने मिटिंग घेऊन स्वागत गीत गायन तयारी व कार्यक्रमाची पूर्वतयारी साठी ३.०० उपस्थित रहावे त्याच वेळी पुरुष सदस्यांनी नियोजन किती प्रमाणात पूर्ण झाले याच्यासाठी उपस्थित राहावे असे ठरवण्यात आले.*

*६]हळदी कुंकूसाठी वाणाचे साहित्य किशोर शिरसाठ ,गुलाबराव मगरे,सचिन कोळी यांनी एकत्रित येऊन वस्तू खरेदी कराव्यात.*

*७] येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत व नोंदी लक्ष्मण कोळी सर,सोनवणे सर,शेखर शिरसाठ यांनी कराव्यात.*

*८]कार्यक्रमात भोजन व्यवस्थेची देखरेख अनिल शिरसाठ ,वाघसर,जगताप सर,सुरेश नवसारे सर यांनी पहावी.*

*९]फोटोग्राफी साठी डॉ.सचिन वेंदे सर कॅमेरा आणावा कार्यक्रमाचे फोटोग्राफी करावी यांना डॉ.अविनाश मगरे,प्रवीण बागुल,प्रीतम कोळी करतील.*

*१०]कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रकाश चव्हाण सर करतील. त्यांना सहकार्य प्रमिला चव्हाण,सुनयना चव्हाण करतील.*

*११]कार्यक्रमाच्या बातम्या प्रसारित करण्याची जबाबदारी राजेंद्र निकुंभे सर,निलेश कोळी सरांनी घ्यावी.*

*१२] बक्षीस वितरण प्रसंगी ट्रॉफी विगतवारी व देणे यांचे नियोजन महेंद्र चव्हाण सर,शिरसाठ सरांनी करावे.*

*१३]कार्यक्रम रूपरेषा*

*वेळ १०-०० ते ११.००*

 *रांगोळी स्पर्धेत सहभागी होणा-या महिलांनी आपल्या रांगोळ्या आदित्य हॉल मधील नियोजित स्थळी काढाव्यात.*

*वेळ ११-०० ते १२.००*

*कोण होईल वाल्मिकीचार्य ?गेम*

*इयत्ता १ ते ७ वर्गातील मुले मुली लहान गट.*

*इयता ८ वीच्या पुढील मुले मुली मोठा गट*

*या खेळात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यानी आपली नावे प्रकाश चव्हाण सरांना ९९६०१२५९८१ या नंबरावर whatsapp द्वारे १३ तारखेपर्यंत कळवावीत.*

*या वेळेतच महिलांचा हळदीकुंकूचा कार्यक्रम पार पडेल.*

*वेळ १२-०० ते १२.३०*

*चमचा लिंबू खेळ मुले ,मुली, महिला.*

*वेळ १२-३० ते १.००*

*संगीत खुर्ची मुले मुली,महिला*

*वेळ १-०० ते १.३०*

*होम मिनिस्टर खेळ*

*वेळ १-३० ते २.३०*
 *भोजन अवकाश*

*वेळ २-३० ते ३.३०*

*१] अध्यक्ष निवड – भारत वेंदे साहेब करतील, अनुमोदन शिरसाठ सर करतील [नियोजित अध्यक्ष –संजय शिंदे सर]*

*२] कार्यक्रम स्थळी उपस्थित ५ ज्येष्ठ व्यक्तींना स्टेजवर बसण्याची सूचना देतील*

*३]स्वागत गीत – महिला प्रतिनिधी*

*४] मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी प्रतिमा पूजन*

*५] श्रद्धांजली कार्यक्रम निवेदन निलेश कोळी सर*

*६]कार्यक्रमाचे प्रास्ताविक -  सुदाम चव्हाण सर*

*७] मनोगत – राजेंद्र निकुंभे ,बापू चव्हाण,गुलाबराव मगरे,भारत वेंदे, संगीता चव्हाण व आकस्मिक कोणही एक प्रत्येक वक्त्याने फक्त ५ ते ७ मिनिटांत आपले मत मांडावे असे ठरवण्यात आले आहे.कृपया बंधन पाळावीत.*

*वेळ ३.३० ते ४.३०*

*मान्यवरांचा सत्कार –आकाश आखडमल*

 *सेवानिवृत्ती सत्कार –सुरेश कोळी,विजय* *वाकडे,मधुकर* *शिरसाठ,सुरेश अंतुर्लीकर*

*बक्षीस वितरण समारंभ.*

*वेळ ४.३० ते ५.००*
*अध्यक्षीय मनोगत*
*आभार-गणेश शिरसाठ मानतील.*

*नियोजनात आणखी बरेच सद्स्य्याना समावेश करायचा अनवधानाने टाईप करायचा राहिला असेल चूकभूल देणे घेणे.*
*कृपया नियोजनातील काही नावे आपण सर्वांनी Add करावेत.*
🙏🙏🙏🙏🙏
*प्रकाश चव्हाण*

Sunday, 14 January 2018

दि.१४ जानेवारी २०१८ च्या सभेचे इतिवृत्त

                            आज दि.१४ जानेवारी २०१८ रोजी मकरसंक्रांतचे मुहूर्त साधत श्री राजेंद्र निकुम्बे याच्या घरी समाज बांधवांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.
 सभेच्या सुरवातीस श्री.संजय शिंदे यांचे चुलते कै.गोटन गुमान शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 सभेत चर्चिले गेलेले विषय
विषय क्र.१ मागील सभेचे  इतिवृत्ताचे वाचन व कायम करणे.
 श्री. प्रकाश चव्हाण सरांनी  दि १७/१२/२०१७ रोजी घेण्यात आलेल्या समाज बांधवांचा स्नेहमेळावा सभेचे  ब्लॉगवर अपलोड केलेले इतिवृत्ताचे वाचन केले. त्यास सर्वानुमते संमती देण्यात आली.व इतिवृत्त कायम करण्यात आले.
विषय क्र.२    दि १७/१२/२०१७ रोजी घेण्यात आलेल्या समाज बांधवांचा स्नेहमेळावा सभेचा ताळेबंद सादर करणे.
    श्री.सुदाम चव्हाण सरांनी दि १७/१२/२०१७ रोजी घेण्यात आलेल्या समाज बांधवांचा स्नेहमेळावा सभेचा ताळेबंद सादर केला.सभेत ६० पेक्षा जास्त परिवार जमले होते. आपण सर्वांनी केलेल्या आवाहनानुसार ४५४०० रु.जमा झाले होते.मिटीग हॉल  जेवणाचा खर्च  ट्रॉफी व इतर खर्च मिळून ३५७४० रु.खर्च झाला असून ९६६० रु.शिल्लक आहेत.असा विस्तृत ताळेबंदास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
विषय क्र.३  महिला बघिनींचा हळदी कुंकुचा कार्यक्रम घेणे.
श्री.महेद्र चव्हाण,बापू चव्हाण,नवसारे सर व इंतर उपस्थित समजा बांधवांनी महिला सदस्यांनाही आपल्या संघटनेत सहभाग करता यावा समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी व समस्यांची माहिती होण्यासाठी महिलांनाही एकत्रित करण्याच्या दृष्टीने महिला बघिनींचा हळदी कुंकुचा कार्यक्रम घेणे गरजेचा आहे असा विषय मांडला.त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन महिलांनीच करावे या दृष्टीने महिलांनीच WHATSAPP गृप तयार करून लवकर नियोजन करावे असे मत सर्वांनी मांडले
विषय क्र.४  समाज  सबलीकरण व विविध उपक्रम साठी निधी संकलन
 समाज  सबलीकरण साठी आपण  विविध उपक्रम राबविणार असून त्यासाठी थोड्या प्रमाणात  निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे आपण एकत्रित निधीचे आवाहन केल्यास ते पुरेशा प्रमाणात संकलन न झाल्यास आपणास विविध उपक्रम घेणे शक्य होणार नाही त्यासाठी दरमहा १०० रु प्रमाणे आपण निधी संकलित केल्यास दरवर्षी विविध कार्यक्रम घेणे ,समाज प्रबोधनासाठी बाहेरच्या तज्ञांची मदत घेणे सहज शक्य होणार असल्याचा विषय
श्री सुदाम चव्हाण सरांनी मांडला त्यास निलेश शिंदे , ललित कोळी , जगन चव्हाण , घनशाम कोळी , व नवसारे सर व सर्वांनी सहमत दशावत सहमती दिली.
विषय क्र ५  समाज  सबलीकरण व विविध उपक्रम साठी कामाची वाटणी
 श्री राजेंद्र निकुम्बे सरांनी समाज  सबलीकरण व विविध उपक्रम साठी कामाची वाटणी करावी असा विषय मांडला त्यास सर्वांनी सहमती दर्शवत नियोजन करण्यात आले.
विषय क्र ६.ऐन वेळी येणारे विषय 
१.  श्री   शिंदे सरांनी आपल्या   समाज बांधवांना संघटीत करण्यासाठी नाशिक शहरात स्थित मात्र  कार्यापासून अलिप्त   समाज बांधवांच्या   घरी जावून आपण उदबोधन करुयात असा विषय मांडला त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
२.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय विरुध्ध श्री शरदचंद्र जाधव व अकोसाकार सरांनी पिटीशन दाखल केली असून त्यासाठी मोठ्या निधीची गरज पडू शकते त्यांना आपल्या नाशिक संघटनेकडून काही निधी देता येईल का ? हा विषयश्री राजेंद्र निकुम्बे सरांनी मांडला. याबाबत चर्चा करण्यात आली.त्यास यथाशक्ती सर्वांनी सहकार्य निधी देण्यावर सहमती घेण्यात आली

श्री राजेंद्र निकुम्बे सरांनी सभेचे छान आयोजन केले होते. सर्वांना चहा पान व तिळगुळ देवून सभेची सांगता झाली.
मिटिंगचे क्षणचित्रे








.

अ.नं.
 सभेत सहभागी समाज बांधवांचे  नाव
श्री सुदाम लोटन चव्हाण
श्री बापू हिलाल चव्हाण
श्री.देविदास नवसारे
श्री सामेश्वर कोळी
श्री लक्ष्मण आर कोळी
श्री ललित सुरेश कोळी
श्री प्रकाश लोटन चव्हाण
श्री. जगदीश घनश्याम चव्हाण
श्री निलेश मोहन कोळी
१०
श्री. सुरेश भिका नवसारे
११
श्री.राजेश भाईदास शिरसाठ   
१२
श्री घनश्याम दौलत कोळी  
१३
श्री महेंद्र मगन चव्हाण  
१४
श्री चंद्रशेखर एकनाथ शिरसाठ  
१५
श्री.यशवंत मानिलाल शिरसाठ  
१६
श्री युवराज कथ्थू कोळी  
१७
श्री राजेंद्र निकुंबे

Tuesday, 19 December 2017

धुळे नंदुरबार जिल्हा आदिवासी टोकरेकोळी,कोळी महादेव जमात यांचा स्नेहसंमेलन सोहळा

धुळे नंदुरबार जिल्हा आदिवासी टोकरेकोळी,कोळी महादेव जमात यांचा स्नेहसंमेलन सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न
                 दि.१७/१२/२०१७ रोजी धुळे नंदुरबार जिल्हा आदिवासी टोकरेकोळी, कोळी महादेव समाज बांधवांचा स्नेह संमेलन सोहळा आदित्य हॉल इंदिरानगर नाशिक येथे उत्साहात पार पडला.नोकरी निमित्त व व्यवसाय निमित्त आलेल्या विखुरलेल्या  समाज बांधवांना एकत्रित आणून विचारांची देवाणघेवाण करणे, आदिवासी टोकरेकोळी,कोळी महादेव समाज बांधवांना जातीचा दाखला मिळण्यात येणा-या अडचणी व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा मनमानी कारभार यावर विचार विनिमय व्हावा.हा कार्यक्रमाचा प्रमुख हेतू होता.
                  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.सुदाम चव्हाण यांनी स्वीकारावे अशी सूचना श्री.संजय शिंदे यांनी मांडली  त्यास बापू चव्हाण यांनी अनुमोदन दिले.सूत्र संचालन सौ.रुपाली चव्हाण,मनीषा शिंदे व संगीता चव्हाण पोर्णिमा शिरसाठ यांनी केले.
                 चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे या मधुर गाण्याने मुलींनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर श्री.सुदाम चव्हाण,श्री.मगन कोळी ,श्री.हिलाल चव्हाण,बाबुराव कोळी,मधुकर शिरसाठ यांच्या हस्ते समाजातील गुणवंत २१ विद्यार्थींचा ट्राफी देऊन सन्मान करण्यात आला. श्री.प्रकाश चव्हाण यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक व इतर विविध संस्थेमार्फत मिळालेल्या १० आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार बद्दल व श्री सुरेश नवसारे यांना वसंत सोशल फौंडेशन तर्फे मिळालेल्या वसंत पुरस्कार साठी समाजाकडून सन्मानित करण्यात आले.
                   सभागृहात उपस्थित ७० ते ८० कुटुंबीयांनी आपला व आपल्या कुटुंबातील सदस्यांचा परिचय करून दिला.तर राजेश बापू शिरसाठ,सौ सविता घनश्याम कोळी,ऋषिकेश किशोर शिरसाठ,विजय कोळी, आबा कोळी,महेंद्र निकुंभे यांनी समाजातील प्रगती व भविष्यकालीन समस्यांवर उपाय योजना या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
                      श्री.प्रकाश चव्हाण यांनी आपल्या तंत्रस्नेही कामाची झलक दाखवली. धुळे नंदुरबार जिल्हा आदिवासी टोकरेकोळी, कोळी महादेव समाज बांधवांचे संघटीत कार्य एका क्लिकवर जगभरात पाहता येईल यासाठी
ची निर्मिती  केली असून ब्लॉगवर नाशिक जिल्ह्यात नोकरी निमित्त व व्यवसाय निमित्त आलेल्या समाज बांधवांची कौटुंबिक माहिती, समाजामार्फत राबविले जाणारे विविध कार्यक्रम ,समाजाच्या होणा-या सहविचार सभांचे इतिवृत्त , समाजातील गुणवंत विद्यार्थी व सदस्यांना या ब्लॉगवर विशेष स्थान देण्यात आलेले आहे.या ब्लॉगची माहिती दिली.
                   अध्यक्षीय भाषणात श्री.सुदाम चव्हाण यांनी विखुरलेल्या समाजाला एकसंघ करणे खूपच गरजेचे आहे त्या दुष्टीने आज आपण प्रथम पाऊल टाकले आहे.यापुढे समाजप्रबोधनपर अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचा आपला मानस असून आपण त्यास पूर्णत: पाठींबा देणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे.आपल्या संपर्ण टीमने आजचा कार्यक्रम चांगला होण्यासाठी खूपच कष्ट घेतले याबद्दल मी आपला ऋणी आहे असे मनोगत व्यक्त केले व दि.१८/१२/२०१७ पासून आदिवासी विकास भवनासमोर सुरु होणाऱ्या उपोषणास व आंदोलनास सर्वांनी पाठींबा द्यावा व शक्य असल्यास नाशिक आदिवासी विभाग येथे उपस्थित राहावे असे आवाहन केले.
              उपस्थितांचे आभार श्री.प्रकाश चव्हाण सरांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खालील समाज  बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.

अ.नं.
समाज बांधवांचे  नाव
कुटुंबातील सदस्य
श्री सुदाम लोटन चव्हाण
श्री बापू हिलाल चव्हाण
श्री गुलाबराव दिनकर मगरे
श्रीम.प्रमिला अनंत चव्हाण
श्री दिलीप लोटन चव्हाण
श्री विजय अभिमन्यू सोनवणे
श्री प्रकाश लोटन चव्हाण
श्री. भालचंद्र सिताराम कोळी
श्री देविदास बारकू नवसारे
१०
श्री. अशोक पोपटराव जगदाळे
११
श्री.भरत वेडू निकम  
१२
श्री शैलेश भरत मगरे
१३
श्री संजय भिला चित्ते
१४
श्री मधुकर आनंदा शिरसाठ
१५
श्री.प्रमोद देविदास सावळे
१६
श्री सुरेश भिका नवसा रे
१७
श्री राजेश भाईदास नवसारे
१८
श्री पोपट हरचंद शिरसाठ
१९
श्री संजय नथू जाधव
२०
श्री जगन्नाथ हांडू देवरे
२१
श्री चंद्रशेखर एकनाथ शिरसाठ
२२
श्री बाबुराव हिरामण कोळी
२३
श्री प्रकाश संभाजी शिरसाठ
२४
श्री सखाराम काशीराम चित्ते
२५
श्री लक्षमण राजाराम कोळी
२६
श्री छोटू लक्ष्मण शिरसाठ
२७
श्री बबन उखा बागुल
२८
श्रीम.प्रतिभा काशिनाथ इशी
२९
श्री किशोर डोंगर नवसारे
३०
श्री राजेंद्र निकुम्बे
३१
श्री विनायक जतन शिरसाठ
३२
श्री दिलीप जतन शिरसाठ
३३
श्री.सामेश्वर पुंडलिक कोळी
३४
श्री रविद्र गोविंदा कोळी
३५
श्री विजय रामचंद्र कोळी
३६
श्री मनोज रतनराव जगताप
३७
श्री रवींद्र झुलाल बोरसे
३८  
श्री दीपक युवराज कोळी
३९
श्री बन्सिलाल लक्ष्मण शिरसाठ
४०
श्री हरीश्चंद हिलाल चव्हाण
४१
श्री.दयानंद शामराव कोळी [वाकडे]
४२
श्री.किशोर सीताराम शिरसाठ
४३
श्री. प्रशांत शामराव कोळी [वाकडे ]
४४
श्री. निलेश मोहन कोळी
४५
श्री. ललित सुरेश कोळी
४६
डॉ.पंकज वसंतराव ईशी
४७
श्री. निंबा रतन चव्हाण
४८
डॉ  श्री.अविनाश हंसराव मगरे
४९
श्री. सुभाष वामनराव जगदाळे
५०
श्री.यशवंत मणिलाल शिरसाठ
५१
श्री.संजय गोरख शिंदे
५२
श्री. महेंद्र रमेश जगदाळे
५३
श्री.महेश मच्छिंद्र सावळे
५४
श्री. महेंद्र मगन चव्हाण
५५
श्री. प्रवीण किसन बागुल
५६
शशिकांत भाईदास शिरसाठ
५७  
श्री.राजेंद्र रघुनाथ चव्हाण
५८
श्री. योगेश देविदास सोनवणे
५९
श्री. संतोष देविदास चित्ते
६०
श्री सचिन मधुकर बागुल